खोतांची जीभ घसरल्यानंतर राऊत, शेलार अन् राणेंची भाषाही घसरली; कुत्रा, टॉमी, बुलडॉग, डुक्कर आणि साप…

| Updated on: Nov 08, 2024 | 11:31 AM

शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र आधी सदाभाऊ खोत यांची भाषा घसरल्यानंतर आता संजय राऊत यांच्या आशिष शेलार आणि नितेश राणे यांची भाषाही घसरली.

शरद पवारांबद्दल बोलताना सदाभाऊ खोतांची पातळी घसरली आणि टीकेचा भडीमार झाल्यावर खोतांनी गावगड्याची भाषा सांगून दिलगिरीही व्यक्त केली. सदाभाऊ खोत यांची भाषा घसरल्यानंतर आता संजय राऊत यांच्या आशिष शेलार आणि नितेश राणे यांची भाषाही घसरली. कारण राजकीय नेत्यांची भाषा आता कुत्रा, टॉमी, बुलडॉग, डुक्कर आणि सापापर्यंत आलीये. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपकडे असे डॉगस्कॉड असल्याची टीका करत देवेंद्र फडणवीसांचं याला समर्थन आहे का? असा सवाल केलाय. गोपीचंद पडळकर यांच्या जतमधील सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर वादग्रस्त टीका केली होती. त्यानंतर सदाभाऊ खोतांकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. तर अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांना फोन करून चांगलंच झापल्याचे त्यांनी सांगितले. ‘सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. मी काल तीव्र शब्दात निषेध केला. मी एवढ्यावरच थांबलो नाही. मी त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं तुम्ही जे स्टेटमेंट केलं, ते आम्हाला कोणाला आवडलेलं नाही. कोणाविषयी व्यक्तीगत कोणाबद्दल बोलणं ही आपली पद्धत नाही. त्याबद्दलचा निषेध केला आहे’, असे अजित पवार म्हणाले.

Published on: Nov 08, 2024 11:31 AM
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, राऊत विरुद्ध सोपल आमने-सामने; बार्शीतील राजकारण तापलं
इंडिन vs घड्याळ… पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा