‘संजय राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही त्यांच्या…’, भाजपच्या बड्या नेत्याचा घणाघात

| Updated on: Nov 20, 2024 | 10:43 AM

संजय राऊत यांनी वोट जिहाद आणि नोट जिहाद असं म्हणत भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय. 'संजय राऊत यांचाच कट जिहाद झाला आहे.'

उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वोट जिहाद आणि नोट जिहाद असं म्हणत भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय. ‘संजय राऊत यांचाच कट जिहाद झाला आहे. जिहाद करूनही त्यांचा कट झाला आहे. जिहादची भाषा करूनही त्यांच्या मतात कटोत्री झाली आहे. जिहादवाल्यांना सोबत घेऊनही त्यांचा पक्ष कट झाला आहे. त्यामुळे ते कट जिहादचे लोकं असं बोलतात.’, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, विनोद तावडे आणि विरार कॅश कांड या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी काल आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप-शिंदे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे आणि जितेंगे असं काही आहे का? त्याचा छडा लागायला पाहिजे. हा भाजपचा नोट जिहाद आहे, पैसा बाटेंग और जितेंगे असं काहीसं आहे. यावर आता कठोर कारवाई व्हायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Published on: Nov 20, 2024 10:43 AM
Ajit Pawar : अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामतीच्या काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
नाशकात तुफान राडा, सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडलं?