Ashish Shelar | 65 वर्षात राज्यात असं उलट्या काळजाचं सरकार पाहिलं नाही : आशिष शेलार
मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे. मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 40 जणांचे बळी तुम्ही घेतलेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली
मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे. मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 40 जणांचे बळी तुम्ही घेतलेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली. आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे 80 हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत. पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? असा सवालही त्यांनी केला. उद्या यासाठी महानगरपालिका आयुक्तांची यासाठी भेट घेणार असल्याच ही ते म्हणाले.