उद्धव ठाकरे गटाची फाटली, मनसैनिकांच्या शेण हल्ल्यावर भाजप नेत्याचा घणाघात

| Updated on: Aug 12, 2024 | 12:30 PM

आगामी निवडणुका सुरू होण्यापूर्वी हमरा-तुमरी, तू का मी... या पद्धतीची भाषा, आणि त्याची उपयोगिता उद्धव ठाकरेंनी करून महाराष्ट्राचं प्रगल्भत्व देशाला माहित होतं त्यावर प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलंय. तर ठाण्यातील मनसेच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे गट घाबरला आहे. सध्या तेच झालंय... कारण उद्धव ठाकरे गटाची फाटली असे म्हणत आशिष शेलारांनी हल्लाबोल केलाय.

ठाण्यात केलेल्या आंदोलनानंतर आणि ठाण्यातील मनसैनिकांच्या शेण हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची फाटली असल्याचे चित्र स्पष्ट दिसतंय, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. अश्लील भाषा, शिव्यांचा उपयोग, मर्यादा आणि पातळी सोडून बोलणं याचे जनकच संजय राऊत आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमाच नाही तर डांबर लावण्याचं काम आणि वक्तव्य हे संजय राऊत यांचं कर्तृत्व आहे, असे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाने असे धंदे सुरू केलेत यानंतर महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. त्याचाच एक प्रयोग जनतेने पाहिला तो म्हणजे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून हल्ला करून विरोध केला गेला. पण राज ठाकरे जोपर्यंत शांत आहे, राज ठाकरेंना मी चांगलं ओळखतो, त्यांचा स्वभावही मी ओळखतो, तोपर्यंत ठीक आहे. अन्यथा उद्धव ठाकरे पक्षाची पळता भुई थोडी होईल, असे म्हणत आशिष शेलार यांनी उबाठाला इशारा दिला आहे.

Published on: Aug 12, 2024 12:30 PM
Parali Vaijnath Jyotirlinga : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; जाणून घ्या, श्रावणी सोमवारचं महत्त्व
कोकणातलं फणस सुद्धा उठलं… मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा नारायण राणेंना डिवचलं