‘राऊतांना ‘सिल्व्हर ओक’चा बुलडॉग म्हटलं तर चालेल का?’, भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक सवाल

| Updated on: Nov 07, 2024 | 3:54 PM

शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करताना सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर बोलताना सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, अशी जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजपच्या नेत्यानं यावर पलटवार केलाय.

‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ शरद पवारांच्या आजाराबाबात असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी जतमधील एका सभेत केलं आणि विरोधक आक्रमक झालेत. यावेळी संजय राऊतांनी सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा असल्याचे म्हटले. तर यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केलाय. ‘देवेंद्र फडणवीस यांचे गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोन कुत्रे आहेत. हे दोघंपण शरद पवार असो किंवा इतर कोणी नेता असो त्यांच्यावर भूंकत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीसांचा तिरस्कार करते. सर्वात पहिले गोपिचंद पडळकर ते पण अशीच भाषा वापरायचे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच राजकारणात आणलं होतं. आता हे सदाभाऊ खोत आहेत’, असे म्हणत असताना संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांची औकात काढली. काय केलं त्यांनी राजकारणात? असा सवालच संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांना अप्रत्यक्षपणे केलाय. दरम्यान, संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. शेलार म्हणाले, संजय राऊत यांना कोणी ‘सिल्व्हर ओक’चा तुम्ही बुलडॉग आहात, असं म्हटलं तर चालेल का? असा विचार करून त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलावं, असं वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना एका वाक्यात उत्तर देत चांगलंच फटकारलं आहे.

Published on: Nov 07, 2024 03:54 PM
शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीवर अजित पवार यांचं मिश्कील भाष्य, ‘मला तर मागचा अनुभव…’
सलमान खान नंतर बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन अन्…