कोकणातील रिफायनरी पाकिस्तानात?, उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांचा आरोप
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पाकला मदत?, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
मुंबई, २९ जुलै २०२३ | कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आले आहेत. कारण बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी आता पाकिस्तानात जाणार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. तसा करारच सौदीमधील कंपनीने पाकिस्तानशी केलाय. भारतातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. तर उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाला विरोध करून सरळ पाकिस्तानला मदत केली का? असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल केला आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?, असाही प्रश्न विचारला आहे.
Published on: Jul 30, 2023 07:41 AM