Ashish Shelar | राज्यात दंगली, राड्यांना थारा नाही; फडणवीसांची ती भूमिका योग्यच- आशिष शेलार
रविवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शरसंधाण साधत देवेंद्र फडणवीसांची जोरदार पाठराखण केली.
मुंबईः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव ही तीन शहरे अचानक पेटली. त्यावरून सुरू झालेला राजकीय वादविवाद काही केल्या थांबायला तयार नाही. रविवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शरसंधाण साधत देवेंद्र फडणवीसांची जोरदार पाठराखण केली. यशोमती ताई फिरतात, पण विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे, असा सवाल त्यांनी केला. शिवाय हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली.