मशाल आहे की आईस्क्रीमचा…, भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
आता या गर्मी उन्हाळ्यामध्ये लोकांना आईस्क्रीमचा कोन हवाय मशाल नको, असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तर मशाल आणि मशालीची धग याला लोकं कंटाळतील, फेटाळतील आणि लाथही मारतील. त्यामुळे आता... आशिष शेलारांनी काय केली सडकून टीका?
मशाल आहे की आईस्क्रीमचा कोन? हे आधी ठरवा, असं वक्तव्य करत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. कारण आता या गर्मी उन्हाळ्यामध्ये लोकांना आईस्क्रीमचा कोन हवाय मशाल नको, असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तर मशाल आणि मशालीची धग याला लोकं कंटाळतील, फेटाळतील आणि लाथही मारतील. त्यामुळे आता लोकांना आईस्क्रीमचा कोन हवाय, म्हणून त्यांना माझी विनंती आहे, मशाल आणि आईस्क्रीमचा कोन हे दोघेही समसमान दिसतंय, त्यामुळे आईस्क्रीमचा कोन घ्या… त्यामुळे का होईना लोकं तुम्हाला थोडी बहुत पसंती देतील, असं वक्तव्यही आशिष शेलार यांनी करून उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला डिवचलं आहे.
Published on: Apr 16, 2024 05:15 PM