भाजप आमदारांच्या मागणीमुळे अकृषिक कर रद्द झाला : Ashish Shelar
विधानसभेत आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधी सुचना मांडून मुंबई उपनगरातील अकृषिक कराच्या नोटींसींचा विषय मांडला. मुंबई उपगरात राहणाऱ्या सुमारे 60 हजाराहून अधिक नागरीकांना शासनाकडून अकृषिक कराच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसा अन्याय कारक आहेत याकडे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.
मुंबई : मुंबई उपनगरातील रहिवांना बजावण्यात आलेल्या अकृषिक कराच्या नोटींसींना स्थगिती देण्यात आली आहे. तशी घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा करतानाच कायम स्वरुपी या नियमात बदलण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल, असेही जाहीर केले. विधानसभेत आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधी सुचना मांडून मुंबई उपनगरातील अकृषिक कराच्या नोटींसींचा विषय मांडला. मुंबई उपगरात राहणाऱ्या सुमारे 60 हजाराहून अधिक नागरीकांना शासनाकडून अकृषिक कराच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसा अन्याय कारक आहेत याकडे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. ज्यावेळी उपगरामध्ये इमारती, चाळी व अन्य रहिवाशी बांधकामे करण्यात आली त्यावेळी प्रत्येक बांधकामाने अकृषिक कर भरला. त्यानंतर ही प्रत्येक वेळा त्यांना या कराच्या नोटीसा बजावल्या जातात. याबाबत मागिल सरकारच्या काळापासून विविध पातळीवर पाठपुरवा केल्यानंतर ही पुन्हा पुन्हा अशा नोटीस बजावण्या येतात. या खात्यातील अधिकारी हे का करतात ? असा सवाल करीत आमदार शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील सारस्वत गृहनिमाण सोसायटी, सेंट सॅबेस्टीयन सोसायटी, सॅलसेट सोसायटी या मोठया सोसायटयांना बजावण्यात आलेल्या नोटीसी विधानसभेत सादर केल्या.