Special Report | शरद पवारांच्या एकेरी उल्लेखामागे चंद्रकांत पाटलांची ‘घसरगुंडी’!

| Updated on: Oct 18, 2021 | 8:50 PM

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. त्यांनी त्या विधानाचा अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं. पण आज चंद्रकांत पाटलांनी पवरांना एकेरी बोलण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं आहे.

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते. त्यांनी त्या विधानाचा अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं. पण आज चंद्रकांत पाटलांनी पवरांना एकेरी बोलण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar यांनी कधीतरी खरं बोलावं, Sadabhau Khot यांचा टोला
Special Report | महाविकास आघाडीचे काही मंत्री भाजपविरोधात मवाळ आहेत?