मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; रोहिणी खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं मिश्किल भाष्य

| Updated on: Jun 26, 2024 | 4:20 PM

रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना, मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण करुन दिली. यावेळी त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला बदाम पाठवतोय.... यावर चंद्रकांत पाटील म्हणाले....

रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना, मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण करुन दिली. यावेळी त्या असं म्हणाल्या, “महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तुम्हाला बदाम पाठवतोय. कारण आपण स्वत: घोषणा केली आहे. आता मुलींच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. माझ्या सगळ्या मुली शासन आदेश निर्गमित व्हावा, उच्च शिक्षण मोफत केलं जाणार त्याची वाट बघतोय. दादा हे बदाम खावेत, त्या घोषणेची आठवण व्हावी, एवढची माफक अपेक्षा आहे”. रोहिणी खडसेंच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल भाष्य केले आहे. ‘रोहिणी खडसे माझ्यामध्ये आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कन्फ्यूज झाल्या असतील. ते चंद्रकांत पाटील त्यांच्या तालुक्यातील मुक्ताई नगरचे आहेत. त्यांच्यासाठी हे बदाम असावेत’. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. इतकंच नाहीतर ते असेही म्हणाले की, ‘मी कोल्हापूरचा माणूस आहे. मला बदामाची आवश्यकता नाही.’

Published on: Jun 26, 2024 04:20 PM
‘मी ओरिजनल, शेवटी ब्रँड हा ब्रँड’, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ‘त्या’ स्टाईलवरून नवनीत राणांचा पलटवार
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेण्यास तयार… ‘त्या’ बॅनर्सची का होतेय चर्चा?