चंद्रकांत पाटील यांनी मिसळवर मारला ताव, कुठं घेतला आस्वाद?
VIDEO | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून केले अभिवादन, यानंतर घेतला मिसळीचाही आस्वाद
पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 6 हजार किलोची एकता मिसळ पुण्यात तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर मिसळ यांनी ही मिसळ तयार केली आहे, एक लाख नागरिकांना ही मिसळ वाटली जाणार आहे. सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येत ही मिसळ तयार केल्यामुळे या मिसळीला एकता मिसळ नाव देण्यात आलं आहे. दरम्यान, या मिसळचा आस्वाद भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देशातील जनतेला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. ज्यामुळे टाटानाही एक मत आणि धारावी झोपडपट्टीतील नागरिकांनाही एक मत देण्याचा अधिकार दिला, आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार बाबसाहेबांच्या संविधानाने दिलाय, त्यामुळे मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आज मंत्री होऊ शकलो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी आज बाबासाहेबांना अभिवादन करताना दिली. पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले.