Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं पकंजा मुंडे यांचं दुर्दैव, म्हणाले…
चष्मा लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.तर पंकजा मुंडे यांच्या प्रश्नासंदर्भातील प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते, हसल्या तरी बातमी होते हे त्यांचं दुर्दैव असल्याचे म्हटले
अमरावती, २४ नोव्हेंबर २०२३ : आमच्या पप्पांनी गणपती आणला… या गाण्याच्या चालीला पंकजा मुंडे यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडीओ तयार केला आहे. चष्मा लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. यामध्ये त्यांनी ताईला चष्मा लागला असे म्हणत जवळचं कमी दिसत होतं. आता अधिक स्पष्ट दिसेल असे म्हटले आहे. तर पंकजा मुंडे यांच्या प्रश्नासंदर्भातील प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते, हसल्या तरी बातमी होते किंवा डोक्यात टेन्शन असलं आणि ते चेहऱ्यावर दिसलं तरी बातमी होते हे त्यांचं दुर्दैव असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.