Mumbai Update | चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर दाखल, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण
मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र मागील काही दिवस पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर अधिकच चर्चेंना उधान आलं आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीला शह देण्यासाठी राज्यात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का? असा सवाल विचारला जात आहे. तसे संकेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज यांच्या निवासस्थानी भेट झाली.