संजय राऊतांचं नाव अमेरिकेच्या निवडणुकीतही असू शकतं, बेळगाव निवडणुकीवरुन Chandrakant Patil यांचा टोला
चंद्रकांत पाटील आज अकोल्यात आहेत. संजय राऊत बेळगाव जिंकेल हा दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकाचाही अभ्यास असून शकतो. मला तिथली परिस्थिती माहीत नाही, असं पाटील म्हणाले.
अकोला: बेळगाव महापालिकेत 30 पेक्षाही अधिक जागा जिंकू, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. बेळगाव जिंकेल असा राऊत दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. चंद्रकांत पाटील आज अकोल्यात आहेत. संजय राऊत बेळगाव जिंकेल हा दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकाचाही अभ्यास असून शकतो. मला तिथली परिस्थिती माहीत नाही, असं पाटील म्हणाले.