‘EVM वर निवडून आलेल्या ‘मविआ’तील सर्वांनी राजीनामा द्या’, भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

| Updated on: Dec 08, 2024 | 1:12 PM

देशात एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे? असा सवाल करत बॅलेटवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्याची तयार शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी दर्शवली. यानंतर काय म्हणाले भाजपचे नेते द्रशेखर बावनकुळे?

देशात एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे? असा सवाल करत बॅलेटवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्याची तयार शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी दर्शवली. ते म्हणाले, ‘माझ्या शपथेपेक्षा, माझ्या आमदारकीपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची आहे. माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही. म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलं, एका पोटनिवडणुकीची चाचणी घेऊन बघा, हे फक्त मीडियासमोर सांगण्यासाठी नाहीतर मी खरोखरचा राजीनामा देतोय’, असं उत्तम जानकर म्हणाले. तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजानामा देण्याची तयार उत्तम जानकर यांनी दर्शविल्यानंतर यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘मविआ’तील सर्वांनी राजीनामा दिले पाहिजे ना… तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता अशाप्रकारचे उद्योग सुरू केलेत मग महाविकास आघाडीतील जे जे लोकं EVM वर निवडून आलेत त्या सर्व नेत्यांनी राजीनामे दिले पाहिजे. मोदींच्या निवडणुकीत तर आम्ही महाराष्ट्रात भाजपला मोठं अपयश आलं तेव्हा आम्ही EVM ला दोष न देता चुका दुरूस्त केल्यात. निवडणुकीच्या पराभवातून आम्ही शिकलो. त्यातून आम्ही पुढे गेलो. तसंच शरद पवारांनी पराभवातून धडा घेतला पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

Published on: Dec 08, 2024 01:12 PM
Sharad Pawar : ‘सांगा काय चुकलं?,’ देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
Rahul Narvekar : राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड