डिपॉझिट जप्त करायचं असेल तर…, चंद्रशेखर बावनकुळे यांच अजित पवारांना चॅलेंज
VIDEO | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसली कंबर, बारामतीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तब्बल 52 शाखांचं उद्घाटन
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघासाठी चांगलीच कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. ते आज बारामतीच्या दौऱ्यावर असून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तब्बल 52 भाजप पक्षाच्या शाखांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थेट चॅलेंज दिलं आहे. अजित पवार यांना निवडणुकीत माझं डिपॉझिट जप्त करायचं असेल तर ते कामठी मतदारसंघात निवडणूक लढायला येतील, असं चॅलेंज बावनकुळे यांनी दिलंय. अजित पवार आणि त्यांच्या सरकारने जे काही दिलं नाही ते सगळं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फक्त घोषणावीर नाहीत. 2024 ला सगळ्यांना कळेल, आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Published on: Mar 26, 2023 07:11 PM