वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले, ‘चांगलं काम करतो म्हणून…’
खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बीडमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच आहे.
बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात असताना लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले. इतकंच नाहीतर खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिक कराडचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आली. यानंतर विरोधकांकडून एकच हल्लाबोल करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना कराडला एकप्रकारे समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले. बानकुळेंनी असे म्हटले की, ‘एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पदं मिळतात. पण जर त्याचं काम वाईट असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी. जर कोणी चुकीचं काम केलं तर त्याला शिक्षा व्हायला हवी, या भूमिकेत सरकार आहे.’, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावर अंजली दमानियांनी प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावनकुळेंवरच निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडचं कर्तृत्व काय, त्यांनी जरा विचार करून बोलायला हवं, असं म्हणत दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना सल्ला दिला. बघा काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे आणि अंजली दमानिया?