…तेव्हा तुम्ही झोपले होते, भाजपच्या बड्या नेत्यानं मराठा आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावलं

| Updated on: Nov 30, 2023 | 12:22 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप करताना देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे वक्तव्य केलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही. तो विचार सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी केला

जळगाव, ३० नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप करताना देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे वक्तव्य केलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही. तो विचार सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांनी कायदा केला. पण या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा ही केस अंतिम टप्प्यात होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नेते झोपी गेले होते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Published on: Nov 30, 2023 12:22 PM