हिंमत असेल तर एक ‘रोखठोक’ त्यावरही येऊ द्या…, चंद्रशेखर बावनकुळेंचं संजय राऊतांना चॅलेंज

| Updated on: May 26, 2024 | 3:12 PM

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण शरद पवारांची चाकरी करतात. राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. भाजप पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या राऊतांना परिवार काय कळणार? भाजपच्या बड्या नेत्याचा संजय राऊतांवर हल्लाबोल

संजय राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तर गटातटाचं राजकारण करणाऱ्या संजय राऊत यांना परिवार काय कळणार? असा सवाल देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर भाष्य करताना केला आहे. ‘संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण शरद पवारांची चाकरी करतात. राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. भाजप पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या राऊतांना परिवार काय कळणार? 2019 मध्ये स्वतः सीएम होण्यासाठी राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण राऊतांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या…’, असे म्हणत बावनकुळेंनी राऊतांना चॅलेंज दिलंय.

Published on: May 26, 2024 03:12 PM
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे पालिकेच्या अधिकाऱ्याच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका, थेट शिंदेंना सवाल
संजय राऊत यांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार…, ‘सामना’तील त्या दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक