‘माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही’, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य, तर बावनकुळे म्हणाले…

| Updated on: Sep 24, 2023 | 3:01 PM

VIDEO | बारामतीतील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धक्कादायक वक्तव्याने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, काय म्हणाले अजित पवार आणि अजितदादांच्या विधानावर काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

बारामती, २४ सप्टेंबर २०२३ | बारामतीमध्ये दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं धक्कादायक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे. आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे. हातात अर्थ खातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण हे पुढे टिकेल की नाही माहीत नाही. पुढचं कुणी पाहिलं नाही, असं अजित पवार म्हणाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात काय होईल कुणालाही माहिती नाही. अजित पवाराचं हे वक्तव्य नैसर्गिक आहे. ते राजकीय विधान नाही. उद्या काय होईल हे तुम्ही तरी सांगू शकता का? तेच अजित पवार यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 24, 2023 03:01 PM
Weather Update | राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
अमित शाह यांच्या दौऱ्याला अजित पवार का होते गैरहजर? एकनाथ खडसे यांनी थेट सांगितलं कारण