सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा; म्हणाले, ही वेळ…
सुप्रिया सुळे दुटप्पी भूमिका घेतात, अशी टीका करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय. 'हा वेळ राजकारण करण्याचा नाही आहे. कारवाई नाही केली तर म्हणायचं की गृहमंत्री काहीच करत नाही. दुटप्पी भुमीका घेणाऱ्या लोकांना काय म्हणायचं..
अमरावती, १ नोव्हेंबर २०२३ | सुप्रिया सुळे दुटप्पी भूमिका घेतात, अशी टीका करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय. ‘हा वेळ राजकारण करण्याचा नाही आहे. एकीकडे मोठी कारवाई झाली तर म्हणायचं चुकीची कारवाई आहे. कारवाई नाही केली तर म्हणायचं की गृहमंत्री काहीच करत नाही. दुटप्पी भुमीका घेणाऱ्या लोकांना काय म्हणायचं..’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. यात कोणी राजकीय पोळी भाजू नये. राजकीय पोळी भाजण्याची ही वेळ नाही. बैठकीला सर्व नेत्यांना बोलावलं होतं पण काही लोकांना प्रसिद्ध घ्यायची असते म्हणून ते म्हणतात मला बोलावलं नाही, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनाही खोचक टोला लगावला आहे.
Published on: Nov 01, 2023 08:42 PM