Chandrakant Patil | सोमय्या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांची आज पत्रकार परिषद
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही आज सोमय्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार आहे. सकाळी 11.30 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. सोमय्यांसह विविध विषयांवर मांडणार भूमिका.
पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली. किरीट सोमय्या सध्या कराडच्या शासकीय विश्रामगृहात आहेत.
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही आज सोमय्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार आहे. सकाळी 11.30 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. सोमय्यांसह विविध विषयांवर मांडणार भूमिका.