Chitra Wagh Video : ‘ओ अनिल परब, हिंमत आहे तुमच्यात…आम्हाला हलक्यात घेऊ नका’; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
अनिल परब यांच्यावर चित्रा वाघ यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात बोलत असताना चित्रा वाघ अनिल परबांवर चांगल्याचं आक्रमक झाल्या होत्या.
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यात ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आल्याने पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकऱणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीचं जुंपली. विधान परिषदमध्ये दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आणला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. परब म्हणाले, आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात पाच वर्ष चालू आहे. आदित्य ठाकरेंचा जो काही या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. दुसरी गोष्ट संजय राठोड, जयकुमारा गोरेच्या केसवर तोंड उघडा. फक्त ठरवून कराताय, असं अनिल परब म्हणाले. दरम्यान, यावरूनच चित्रा वाघ आक्रमक झाल्यात. दिशा सालियनच्या वडिलांनी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर चर्चा सुरू असताना एसआयटीचा रिपोर्ट काय आहे, तो समोर यावा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दुध का दुध पाणी का पाणी झालं पाहिजे, अशी विनंती चित्रा वाघ यांनी केली. तर संजय राठोड यांच्याबाबत तुम्ही काय केलं असं विरोधक म्हणाले, पण मला जे करायचं होतं ते मी केलं. जे मला दिसलं, जे पुरावे आले, त्याच्यावर लढल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.