ठाकरे गटाच्या ‘त्या’ जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप नेमका काय?

| Updated on: May 03, 2024 | 1:42 PM

ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराविरोधात जाहिरात... भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतलाय. यानंतर ठाकरे गटातील सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याकडून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तरही देण्यात आलं. कोणी काय केला हल्लाबोलय़

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतलाय. ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराविरोधात जाहिरात बनवण्यात आली आहे. यामध्ये एका पॉर्न स्टारने पात्र साकारल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय. दरम्यान, चित्रा वाघ यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर राजकारण चांगलंच तापलं. तर ठाकरे गटातील सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याकडून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तरही देण्यात आलं. प्रज्वल रेवन्ना यांनी अनेक महिलांवर अत्याचार केलेत. त्यावर चित्रा वाघ काही बोलणार का? असा सवाल करत प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ठाकरे गट हा महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. बघा स्पेशल रिपोर्ट ठाकरे गटाकडून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना काय सवाल करण्यात आले. चित्रा वाघ यांच्यावर कुणी काय केला हल्लाबोल?

Published on: May 03, 2024 01:42 PM
‘तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं, खिडकी काय दरवाजे उघडले तरी…’, संजय राऊतांचा हल्लाबोल
‘दादा आवाज येत नाही’, अजित पवारांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, नेहमीच्या स्टाईलने दिलं उत्तर