फोटोला फोटोनं उत्तर देणार, अनिल देशमुख यांचा पर्दाफाश होणार? चित्रा वाघ यांचा इशारा
आम्ही मागितलेले पुरावे अनिल देशमुख का देत नाही? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. इतकंच नाहीतर अनिल देशमुखांचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी देशमुखांना इशारच दिला आहे. तर फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं... काय म्हणाल्या चित्रा वाघ?
अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत नव-नवे दावे करत आहे. याप्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. आम्ही मागितलेले पुरावे अनिल देशमुख का देत नाही? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. इतकंच नाहीतर अनिल देशमुखांचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी देशमुखांना इशारच दिला आहे. तर फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं असं चित्रा वाघ यांनी म्हटलं असून त्यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवलं असं थेट नाव घेत नव्या दाव्यांचा सिलसिला सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारून अनिल देशमुखांनी त्यांच्याबद्दलच्या आरोपांवर आणखी एक गौप्यस्फोट केला यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
Published on: Jul 29, 2024 06:04 PM