या विद्वान बाईच्या धाकट्या मुलानं वाहिनीवर हात टाकला अन्… चित्रा वाघ यांची विद्या चव्हाणांवर आगपाखड
चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेत जशाच तसं उत्तर चव्हाणांना देत थेट पलटवार केला. माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली. कालपासून चित्रा वाघ यांचे कारनामे महाराष्ट्राला सांगणार अशी सनसनाटी निर्माण केली. त्या काही चांगल बोलतील अशी अपेक्षा नाही, असं म्हणत त्यांनी खोचक टीका केली.
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिदेत चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. दुसरीकडे याचवेळी चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेत जशाच तसं उत्तर देत थेट पलटवार केला आहे. माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली. कालपासून चित्रा वाघ यांचे कारनामे महाराष्ट्राला सांगणार अशी सनसनाटी निर्माण केली. त्या काही चांगल बोलतील अशी अपेक्षा नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर खोचक टीका करत हल्लाबोल केला. चित्रा वाघ म्हणाल्या, हमे तो इंतजार है विद्या चव्हाण यांच्या पेन ड्राईव्हचा नाही…. हमे इंतजार है अनिल देशमुख यांच्या पेनड्राईवचा… तुम्हाला सांगते तीन तासात तुमच्या सगळ्या क्लिप बाहेर काढणार आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तर विद्या चव्हाणांच्या सुनेच्या विषयावर बोलताना चित्रा वाघ यांनी घडलेला प्रसंग सांगितला. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने आपल्या आईसमान असलेल्या वहिणीवर हात टाकला तिचा विनयभंग केला…