चित्रा वाघ यांचा कोर्टाकडून कठोर शब्दात समाचार, संजय राठोडांवरील आरोप अन् भूमिकेवर कोर्टाचाच सवाल

| Updated on: Aug 09, 2024 | 10:20 AM

परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, अशा शब्दात कोर्टाने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. संजय राठोड यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी कोर्टाने कडक निरीक्षण नोंदवले आहे. संजय राठोड यांच्याविरोधातील प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी कोर्टात धाव घेतली होती.

मी कोर्टात संजय राठोड यांच्याविरोधात लढत असताना पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. पत्रकार परिषदेत लढवय्यासारखी भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांच्या वकिलांकडून काल संजय राठोड यांच्या विरोधातील केस माघारी घेण्याची भाषा केली. त्यावरून चित्रा वाघ यांच्या सारखे राजकारणी जनहित याचिकेद्वारे राजकारण करून न्यायालयाला त्यामध्ये घेचतात. या शब्दात कोर्टाने समाचार घेतला आहे. संजय राठोड यांच्याविरोधातील प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. एका तरूणीसोबत मंत्री संजय राठोड यांचे फोटो व्हायरल झाले होते. काही संवादाच्या क्लिप्सही व्हायरल झाल्या होत्या. त्या तरूणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली. राजीनाम्याच्या मागणीनंतर राठोडांवर गुन्हा दाखल व्हावा, केस सीबीआयला मिळावी म्हणून चित्रा वाघ यांनी कोर्टात धाव घेतली होती. पुढे काय झालं बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 09, 2024 10:20 AM
अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनवरून शिवसेनेच्या मंत्र्याचा टोला, सगळ्यांनी गुलाबी शर्ट घाला अन् योगायोगानं माझं नाव पण…
सेलिब्रिटींच्या एकेका फोटोमागे मिळतो बक्कळ पैसा; कोण आहेत हे पापाराझी? ते नेमकं काय करतात?