Devendra Fadnavis | नितेश राणेंवरील कारवाई सूडबुद्धीने केली गेली – देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकार राणेंना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशाच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात एक नवे ट्विस्ट आणले आहे.
मुंबई : नितेश राणेंचा शोध घेत असताना नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. या प्रकरणात सारखे नवे ट्विस्ट येत आहेत. महाविकास आघाडी सरकार राणेंना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. नितेश राणेंवरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अशाच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात एक नवे ट्विस्ट आणले आहे. 65 वर्षावरील नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही, त्यांची साक्ष घरीच जाऊन घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांनी राणेंना साक्ष द्यायला बोलवून कायदा मोडला आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.