Devendra Fadnavis | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका : देवेंद्र फडणवीस
या बैठकीत तात्काळ आरक्षण लागू झालं पाहिजे आणि आरक्षण लागू होत नाही तोवर निवडणुका नको, ही मागणी पुन्हा एकदा केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच मागील बैठकीत जे मुद्दे मांडले होते. त्यावर आज कायदा आणि न्यायपालिका विभागानं सकारात्मक भूमिका मांडण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. महत्वाची बाब म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे आदेश देण्यावर, तसंच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात पुन्हा बैठक झाली. या बैठकीत तात्काळ आरक्षण लागू झालं पाहिजे आणि आरक्षण लागू होत नाही तोवर निवडणुका नको, ही मागणी पुन्हा एकदा केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच मागील बैठकीत जे मुद्दे मांडले होते. त्यावर आज कायदा आणि न्यायपालिका विभागानं सकारात्मक भूमिका मांडण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.