दत्तक घ्यायचं म्हणजे दलाली खाणं नव्हे, देवेंद्र फडणवीस बरसले…
महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपच्या विविध विकासकामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. गेल्या महाालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, “शहर दत्तक घेतले म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असं […]
महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपच्या विविध विकासकामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. गेल्या महाालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, “शहर दत्तक घेतले म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असं नाही. शहरात एवढी कामे झाली आहेत, त्याच कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांची काम करण्यासाठी हवं असतं”, असा टोला त्यांनी विरोधकांचा नाव न घेता हाणला. तसेच प्रदूषणमुक्त निर्मला गोदावरीसाठी नमामी प्रोजेक्ट केंद्र मंजूर करेल, असा आशावाद व्यक्त केला.
Published on: Feb 21, 2022 04:58 PM