ईश्वराला प्रार्थना आहे, लतादीदींनी लवकर बरं व्हावं- Devendra Fadnavis
आम्हाला विश्वास आहे कोट्यवधी लोकांच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यामुळे या संकटातून त्या बाहेर येतील, अशी आशा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : लता दीदी लवकर बऱ्या व्हाव्या अशी आमची ईश्वराला प्रार्थना आहे. ईश्वराचा चमत्कारच लता दीदी आहेत. ज्याप्रकारे गानकोकिळा म्हणून लता दीदी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला अजून अनेक वर्ष आमच्यात हव्या आहेत. त्यामुळे ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं. आम्हाला विश्वास आहे कोट्यवधी लोकांच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यामुळे या संकटातून त्या बाहेर येतील, अशी आशा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.