देवेंद्र फडणवीस यांचा मविआला चिमटा, “साथ-साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे…”
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत काल विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी सकाळचा भोंगा असं म्हणत संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली यानंतर आज त्यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.
हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे नुकतेच निकाल लागले. एक्झिटपोलनुसार भाजपचा दारूण पराभव होणार असं सांगतलं जात होतं मात्र तो अंदाज खोटा ठरवत भाजपने हरियाणात जोरदार मुसंडी मारली. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं वाटतंय असं म्हणत खोचक टोला लगावला होता. तर आज पुन्हा मविआवर जोरदार टीका करत चिमटाही काढला. ते नागपुरात बोलत होते. ‘हरियाणाचे निकाल लागल्यानंतर एक गोष्ट सांगतो. काँग्रेस, शरद पवार यांचा गट आणि उबाठा सेना हे त्यांची शस्त्र चमकवून बसले होते. हरियाणात भाजपा हरली की आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो. पण ती संधी त्यांना मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे तो त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्र आहोत म्हणणारे, हम साथ साथ है, म्हणणारे हम तुम्हारे है कौन असं विचारु लागले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना पाहण्यास मिळतं आहे.’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा व्हिडीओ