विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभेतील भाषणं चांगलीच गाजताना दिसताय. आपल्या मनसे पक्षाच्या उमेदवारांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रचारसभांमधून राज ठाकरे हे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधताना दिसताय. दरम्यान, यंदा सत्ता द्या, ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे उतरवतो, असं आवाहनच मतदारांना राज ठाकरेंनी केलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला असता त्यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, राज ठाकरे हे आता वेगळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे यांचं आम्हाला समर्थन होतं त्यांनी आम्हाला मदतही केली होती. पण आता ते वेगळं बोलताय. त्यांना आणि त्यांचे पक्षाला काय वाटतं ते आता बोलत आहे. राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाहीत, त्यामुळे आता राज ठाकरे काय बोलताय? हा त्यांचा प्रश्न आहे, असं स्पष्ट मत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.