‘हिम्मत असेल तर..’, इशारा देत भाजपनं उद्धव ठाकरे यांना सांगितलं आघाडीत बिघाडी करण्याचं सूत्र

| Updated on: Mar 27, 2023 | 10:58 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना तंबी देऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे, भाजपनं दिला सल्ला

जळगाव : मालेगावच्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केलेली आम्ही खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना खडसावले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून आता सत्ताधारी भाजपने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सांगावं की आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं पाहिजे. इतकेच नाही तर महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत आहेत, असे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published on: Mar 27, 2023 10:58 PM
शिवेंद्रराजे भोसले यांच्या ‘त्या’ आरोपाला उदयनराजे भोसले यांचं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले?
कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निदर्शन, काय आहे कारण?