‘उद्धव ठाकरे हे संधी साधू राजकारणी’, भाजप नेत्यानं केली घणाघाती टीका

| Updated on: Mar 30, 2023 | 5:32 PM

VIDEO | ... तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांचे वाईट दिवस सुरु झालेत, उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यानं साधला निशाणा

जळगाव : सोनिया गांधींसोबत शपथ घेतली तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंचे वाईट दिवस सुरू झाल्याची घणाघाती टीका भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेच्या टिझरमध्ये राहुल गांधींचा फोटो काढून सोनिया गांधींचा फोटो घेण्यात आलाय. या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारण करत असल्याचंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले. ‘उद्धव ठाकरे संधी साधू राजकारण करताय, आता त्यांनी राहुल गांधींचा फोटो काढून सोनिया गांधींचा लावला, उद्या ते प्रियंका गांधींचा लावतील, मला वाटतं उद्धव ठाकरे लोकांना फार वेळ मूर्ख बनवू शकत नाही, स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना त्यांचे नेतृत्व कसं होतं आणि आपलं नेतृत्व कसं आहे, आपण फक्त संधी बघतात, वेळेप्रमाणे धोरण स्वीकारतात, हे लोकांच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे लोक अजिबात स्वीकारणार नाहीत, ज्यावेळी शपथविधी वेळी सोनिया गांधींसोबत शपथ घेतली की आम्ही फुटणार नाही तेव्हाच तुमच्या वाईट दिवसाला सुरुवात झाली होती, असंही गिरीश महाजन म्हणाले.

Published on: Mar 30, 2023 05:32 PM
बुलढाण्यात रंगाची उधळण करत शिव-पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न
‘हनुमान चालीसा’वरून राणा दाम्पत्याचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार, म्हणाले…