अनिल देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छुक…, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Feb 13, 2023 | 3:51 PM

VIDEO | गिरीश महाजन यांचा अनिल देशमुख यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट अन् राजकीय वर्तुळात खळबळ, बघा काय म्हणाले?

नाशिक : मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख हे तुरुंगात असतांना त्यांना भाजपची ऑफर आली होती, तेव्हा जर ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार आधीच कोसळलं असतं पण मी ती स्वीकारली नाही, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांनाच भाजपमध्ये यायचे होते असा म्हणत मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, उलट देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्यासाठी प्रस्ताव दिला होता. देशमुख यांनी निवडणूक होण्यापूर्वी भाजपमध्ये येण्यासाठी दोनदा प्रस्ताव दिला होता. पण सुदैवाने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आले. आता झालेल्या गोष्टीवर त्यांनी बोलू नये. असा सल्लाही महाजन यांनी दिला आहे.

Published on: Feb 13, 2023 03:51 PM
राजीनाम्यानंतर कोश्यारी म्हणताय, महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी…
गद्दारांच्या सभेला जनतेपेक्षा खुर्च्यांची गर्दी, शिंदे गटावर कुणी केली बोचरी टीका?