काल गारपीट झाली आणि आज विचारताय…, अवकाळी पावसावर काय म्हणाले गिरीश महाजन?
VIDEO | 'गेल्या अडीच वर्षात मागच्या सरकारने दमडी सुद्धा दिली नाही आणि तेच म्हणताय...', गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावला खोचक टोला
मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. काल धुळे जिल्ह्यात जाऊन मी स्वतः पाहणी केली. कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे दोन-तीन दिवसात पंचनामे होऊन त्यांना शासनाच्या मार्फत नुकसान भरपाई दिली जाईल. हे शासन संवेदनशील आहे गेल्या अडीच वर्षात मागच्या सरकारने दमडी सुद्धा दिली नाही आणि तेच म्हणताय कधी देणार मदत, काल गारपीट झाली आणि आज मदत मागताय…, अशी प्रतिक्रिया देत गिरीश महाजन यांनी विरोधकांना खोचक टीका लगावला आहे. तर मदत ही वेळेवरच देऊ त्याच्यात मागे पुढे बघणार नाही.. शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले