‘संजय राऊत हे वैफल्यग्रस्त अन् मोठे भविष्यकार’, भाजपच्या बड्या नेत्याची सडकून टीका?

| Updated on: Sep 23, 2023 | 6:01 PM

VIDEO | 'संजय राऊत हे सध्या वैफल्यग्रस्त आहेत, मनात येईल तसे ते बोलत असतात. त्यांना वाटेल तसे ते सकाळ झाली की बोलायला सुरुवात करतात', भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल काय केली टीका बघा?

जळगाव, २३ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपने राजीनामा घेतला तर परिणाम वाईट होतील असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासह त्यांनी संजय राऊत यांना देखील फटकारले आहे. गिरीश महाजन म्हणाले, बच्चू कडू आणि संजय राऊत हे सुध्दा मोठे भविष्यकार आहेत. बच्चू कडू हे आमचे सहकारी आहे. ते असं का बोलले हे मला माहित नाही, त्यांनी असं भविष्य का वर्तविले ते माहित नसल्याचे महाजनांनी म्हटले आहे. तर संजय राऊत हे सध्या वैफल्यग्रस्त आहेत, मनात येईल तसे ते बोलत असतात. संजय राऊत हे त्यांना वाटेल तसे ते सकाळ झाली की बोलायला सुरुवात करतात. देश पेटेल, पुलवामा परत होईल, खलिस्तान परत होईल, अशा पद्धतीने भडक आणि बालिश स्टेटमेंट करतात त्यामुळे लोक सुद्धा त्यांना आता महत्त्व देत नाही, असे म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Sep 23, 2023 06:01 PM
Rohit Pawar यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं, म्हणाले, ‘…मग तीन महिने काय केलं?’
pawar meet adani | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर रोहित पवार थेटच म्हणाले…