भाजपला मोठा झटका, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

| Updated on: Apr 17, 2023 | 11:15 AM

VIDEO | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश; राजकीय गणित बदलणार?

हैदराबाद : कर्नाटकातील भाजपचे सर्वात मोठे नेते, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपचा काल राजीनामा दिला. यानंतर त्यांनी त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. हा पक्ष प्रवेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का असून शेट्टार यांच्या प्रवेशामुळे कर्नाटकातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे. भाजपकडून शेट्टार यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते आणि त्यांनी भाजपला काल सोडचिठ्ठी दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असताना प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर भाजपचे असंतुष्ट नाराज आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

Published on: Apr 17, 2023 11:07 AM
श्रीभक्तांपेक्षा राजकीय नेत्यांची सोय पाहण्यात आल्यानं ही घटना घडली; राऊत यांची खरमरीत टीका
“मविआ सत्तेसाठी एकत्र, पण त्यांचे विचार एक नाहीत! त्यामुळे वज्रमूठ सभा यशस्वी होणार नाही”