Cabinet Expansion 2024 : चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ ग्रहण

| Updated on: Dec 15, 2024 | 5:53 PM

भाजपचे जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळासाठी मंत्रिपदाची शपथ घेतली. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा आज नागपुरात राजभवनात पार पडत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे भाजपचे जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळासाठी मंत्रिपदाची शपथ घेतली. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नव्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दरम्यान,  मंत्रिमंडळ विस्ताराचा जो फॉर्म्युला समोर आला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 21 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11 ते 12 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 9 ते 10 मंत्रिपद मिळणार आहे.

Published on: Dec 15, 2024 05:53 PM