किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात पहिल्यांदा…

| Updated on: May 20, 2024 | 2:35 PM

'मतदार मोठ्या संख्येने मतदान करतोय. तोच उत्साह आहे जो २०१४, २०१९ ला होता तसाच २०२४ ला पाहायला मिळतोय त्यामुळे यंदा मजबूत सरकार आणि मजबूत प्रधानमंत्री येणार', असं म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी किरीट सोमय्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

ठाणे जिल्ह्यातील मुलुंड येथील नीलम नगर येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मतदार मोठ्या संख्येने मतदान करतोय. तोच उत्साह आहे जो २०१४, २०१९ ला होता तसाच २०२४ ला पाहायला मिळतोय त्यामुळे यंदा मजबूत सरकार आणि मजबूत प्रधानमंत्री येणार’, असं म्हणत किरीट सोमय्यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. पुढे सोमय्या म्हणाले, माझ्यासोबत माझा मुलगा नील, पत्नी मेधा, सून दिव्या आम्ही चौघांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक वर्षांनंतर आयुष्यात पहिल्यांदा माझी आई माझ्यासोबत मतदान कऱण्यासाठी नाहीये, गेल्या दीड महिन्यांपूर्वी तिचं निधन झालं असं म्हणत किरीट सोमय्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 20, 2024 02:35 PM
म्हणून मी पण रांगेत उभं राहिलो, राज्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी केलं मतदान
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमकं काय घडलं?