किरीट सोमय्या यांची सुजित पाटकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार, काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 10, 2023 | 4:55 PM

VIDEO | 'अस्तित्वात नसलेल्या कंपनी ठाकरे यांचं टेंडर', किरीट सोमय्या यांनी नेमकी काय केली टीका?

पुणे : कोविड सेंटर घोटळयाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला असून त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात संजय राऊत यांचे सहकारी आणि पार्टनर असलेल्या सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई पोलिसांना किरीट सोमय्या यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची चौकशी सुरू असून दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुणे महापालिका, पुणे पोलीस आणि पीएमआरडीएने शिवाजीनगर कोविड सेंटरसंदर्भात वेगळा गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली. ईडीने मुंबई महापालिका आयुक्तांना बोलवून लाईफलाईन हॉस्पिटलची तब्बल तीन तास चौकशी केली होती. परंतु, सरकार आल्यानंतर या सुरू असलेल्या चैकशीला आणखी गती मिळावी, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 10, 2023 04:55 PM
सपाचे नेते अबू आझमी यांच्या अडचणीत वाढ; 20 एप्रिलला हजर राहण्याचे कोणाचे आदेश?
सोनी हत्याकांड प्रकरण, मृत्यूदंड की जन्मठेप? कोणती होणार शिक्षा?