किरीट सोमय्या गुप्त बैठकीसाठी शेकडो पोलिसांच्या फौजफाट्यासह संभाजीनगरमध्ये दाखल, कुणाची घेतली भेट?

| Updated on: Aug 16, 2023 | 9:35 PM

VIDEO | भाजप नेते किरीट सोमय्या आज अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, या भाजप नेत्याला शेकडो पोलिसांची सुरक्षा आणि फौजफाटा... किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याची कमालीची गुप्तता, पण कारण नेमकं काय?

छत्रपती संभाजीनगर, १६ ऑगस्ट २०२३ | भाजप नेते किरीट सोमय्या आज अचानक छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेत. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याकरता शेकडो पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेकरता तैनात करण्यात आला होता. किरीट सोमय्या छत्रपती संभाजीनगर सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ईडी चौकशीवेळी उपेंद्र मुळे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर किरीट सोमय्या उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी आता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांना शेकडो पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांच्या आजच्या दौऱ्याची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. ते सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी आले आहेत. भावना गवळी यांच्या ईडी प्रकरणावेळी उपेंद्र मुळे यांचं नाव चर्चेत आलं होतं. भावना गवळी यांनी आपल्याला चुकीचे कागदपत्रे बनवण्याचं सांगितलं होतं, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर भावना गवळींच्या माणसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही उपेंद्र मुळे यांनी केला होता. मुळे यांनी प्रकरणी पोलिसात तक्रार केली होती. त्याच उपेंद्र मुळे यांची किरीट सोमय्या भेट घेत आहेत.

Published on: Aug 16, 2023 09:22 PM
‘राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढवावी’, कुणी लगावला खोचक टोला
‘मी पुन्हा येणार’वरून पुन्हा वार-पलटवार, २०२४ ला भाजपसाठी स्थिती अनुकूल की नाही? काय म्हणाले शरद पवार?