किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर आता कोण? कुणाचा लागणार पुढचा नंबर?

| Updated on: Jan 31, 2023 | 11:51 AM

अनिल परब यांच्यानंतर आता टार्गेट कोण? सोमय्यांनी यांनी सांगितला पुढचा नंबर कुणाचा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या आज अनिल परब यांच्या वांद्र्यातील ऑफिसची पाहणी करणार असून परबांनी जसं ऑफिस तोडलं तसंच रिसॉर्टही तोडावं लागणार आहे, असे म्हणत सोमय्यांनी इशारा दिला आहे. तर या पुढच्या कारवाईसाठी अस्लम शेख यांचा नंबर लागणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले असून त्यांना देखील इशारा दिला आहे.

‘मी आज बारा वाजता अनिल परब यांच्या बांद्रा येथे असलेल्या ऑफिसची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. यापूर्वीच लोकायुक्तांनी पत्र दिलं होतं आणि ही वास्तू अनधिकृत असल्याचं सांगितलं होतं. अखेर अनिल परब यांना ऑफिस तोडावच लागलं.अनिल परब असो मिलिंद नार्वेकर असो किंवा उद्धव ठाकरे असो या सगळ्यांनी कारवाईच्या भीतीनं हे पाऊल उचललेलं आहे. यापूर्वी रश्मी उद्धव ठाकरे यांचे 19 बंगल्याचे प्रकरण मी बाहेर काढलं उद्धव ठाकरे यांनी हे बंगलेच गायब असल्याचं सांगितलं.अनिल परब यांच्या अनधिकृत ऑफिसवर आज म्हाडाचा हातोडा पडणार होता, त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळालं नव्हतं आज मिळणार होतं, पण कारवाईच्या भीतीपोटी अनिल परब यांनी स्वतःहूनच हे अनधिकृत बांधकाम तोडून टाकले. अनिल परब आता तुम्ही जसं ऑफिस तोडले तसेच दापोलीचं रिसॉर्ट देखील स्वतः कधी तोडणार आहात?’ असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Jan 31, 2023 11:44 AM
मागील 9 वर्षातील कामामुळे भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला; द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य
Pune News : पुणे प्राधिकरणातील भरतीचा मार्ग झाला मोकळा