‘त्या’ घोटाळेबाजांना योग्य शिक्षा मिळावी, नाव न घेता किरीट सोमय्या यांचा कुणावर निशाणा?
VIDEO | 'भ्रष्टाचाराचा भस्मासूर असलेले सरकार महाराष्ट्रातून गेले', भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनासाठी आले असता भाजपा नेते किरीट सोमय्यांचा विरोधकांवर हल्लाबोल
ठाणे, २४ सप्टेंबर २०२३ | भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या काल भिवंडीत आल्याचे पाहायला मिळाले. किरीट सोमय्या यांच्या शुभहस्ते नेत्र चिकित्सा शिबिराचा शुभारंभ करून गणरायाचे दर्शन घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी गणरायाकडे काय मागणे मागितले असा प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा भस्मासूर असलेले सरकार महाराष्ट्रातून गेले आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचे आहे. विकासाचे एकापाठोपाठ नवे उपक्रम सुरू करायचे आहेत आणि त्याचवेळी मुंबई महामुंबईमध्ये कोव्हिड काळात, कोव्हिड म्हणजे कमाईचे साधन असे समजून त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी, नेत्यांनी भ्रष्टाचाराचा कहर केला होता. ते जे घोटाळेबाज आहेत त्यांना योग्य शिक्षा मिळावी हा संकल्प मी गणराया चरणी केला आहे, असे सोमय्यांनी म्हटले आहे.