BREAKING | भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक, वाशिममधील घटना
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी आले होते. यावेळी भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगड फेक केली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी आले होते. यावेळी भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली. किरीट सोमय्या हे याठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता लाठीचार करावा लागला.
Published on: Aug 20, 2021 01:24 PM