नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा?

| Updated on: Oct 02, 2024 | 4:17 PM

महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे आता येणारी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली असताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

Follow us on

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर नारायण राणे दाखल झाले आणि त्यांनी तासभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ठाकरे गटाचे वैभव नाईक आहे. हाच मतदारसंघ भाजपला द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंकडे केली. गेल्या काही महिन्यांपासून वैभव नाईक आणि राणे कुटुंबियांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.