Gopichand Padalkar यांची सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टीका; म्हणाले, ‘… लबाड लांडग्याची लेक’

| Updated on: Sep 18, 2023 | 4:57 PM

VIDEO | गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद पुन्हा सुरू, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर केली सडकून टीका, कशी पडळकरांची जीभ घरसली...

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | अहमदनगरच्या चौंडी येथे यशंवत सेनेकडून धनगर समाजाचं आंदोलन सुरू होते. याठिकाणी जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, अशीही टीका केली. ते म्हणाले, “ही लबाड लांडग्याची लेक बोलतेय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही. तर तुम्ही जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आता आमची लोकं सगळी हुशार झाली आहेत. मुलं सगळी हुशार झाली आहेत. लोकांची त्यांच्या विषयीची भावना ही त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार काय बोलले, याला आम्ही काळीची किंमत देत नाही”, असे म्हणत पडळकरांनी खोचक टीका केली.

Published on: Sep 18, 2023 04:57 PM
OBC Protest | ‘… त्याशिवाय ओबीसी आंदोलन मागे घेणार नाही’, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा काय?
Shivsena 16 MLA Disqualification | सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय दिला थेट आदेश?