उद्धव ठाकरेंनी साडी नेसली, बुरखा घातला…, भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
सध्या हिंदुत्त्वाचं नाटक सुरू, त्याचा बुरखा फाडावा लागेल, अशी सडकून टीकाही नितेश राणे यांनी करत उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाजप आणि नरेंद्र मोदी, अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे हे बहूरुपी आणि फिरतं नाट्य मंडळ आहेत, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरून नाटकच सुरू असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सध्या हिंदुत्त्वाचं नाटक सुरू, त्याचा बुरखा फाडावा लागेल, अशी सडकून टीकाही नितेश राणे यांनी करत उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाजप आणि नरेंद्र मोदी, अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुझ्या मालकाने कितींदा वेशांतर केलं आहे, कधी साडी घालून किंवा कधी बुरखा घालून याचे पण काही संदर्भ आम्ही द्यायचे का? आता हिंदुत्वाचं जे नाटक तुझा मालक करतो आहे तो बुरखा आम्हाला कधीतरी फाडावा लागेल. तुझा मालक किती वेळा बुरखा घालून हाजी अलीला जाऊन आलेला आहे. ही माहिती आणि फोटोग्राफ कधीतरी महाराष्ट्राला आम्ही दाखवू’, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.